
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) सुहास गाडे आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) शशिकांत नागरगोजे यांना आपल्या पगारातून पीडित याचिकाकर्त्याला एकूण दोन लाख रुपयांची रक्कम देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.