
अमरावती : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र ठरविण्याच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात देण्यात आलेल्या आव्हानावर आता २४ जूनला सुनावणी होणार आहे. न्यायालयाने माजी आमदार बच्चू कडू यांच्या याचिकेवर बॅंकेसह विभागीय सहनिबंधकांना उत्तर सादर करण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.