esakal | बुलडाण्यात आजवरची सर्वाधिक वाढ; 22 कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

The highest increase to date in buldana; 22 corona positive

तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 82 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा (ता. शेगाव) येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय मुलगी, 2 वर्षीय मुलगी, 6 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षीय पुरुष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे.

बुलडाण्यात आजवरची सर्वाधिक वाढ; 22 कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 82 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा (ता. शेगाव) येथील 55 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, 8 वर्षीय मुलगी, 2 वर्षीय मुलगी, 6 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षीय पुरुष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे.

अशाप्रकारे आळसणा ता. शेगाव येथे 12 रूग्ण आढळले आहे.
तसेच जामठी धाड ता बुलडाणा येथील 26 व 28 वर्षीय महिला, इंदिरा नगर चिखली येथील 55 वर्षीय महिला, नांदुरा येथील 44 व 41 वर्षीय पुरुष, सुलतानपूर ता. लोणार येथील 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षाची मुलगी, जळगाव जामोद येथील 57 वर्षीय महिला, टेंभुर्णा ता. खामगाव येथील 20 वर्षीय तरुण आणि मूळ पत्ता बोदवड, जि. जळगाव येथील सध्या मलकापूर येथे असलेली 24 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


तसेच आज 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आहे. त्यामध्ये धामणगाव बढे ता. मोताळा येथील 42 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, डोणगाव ता मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाला आज सुट्टी देण्यात आली आहे.


आजपर्यंत 3075 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 176 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 176 आहे. तसेच आज 5 जुलै रोजी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 22 पॉझीटीव्ह, तर 82 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 290 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3075 आहेत.


जिल्ह्यात आजअखेर एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 176 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 111 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.