Drowning Incident at Ajanti Dam: हिंगणघाट तालुक्यातील आजंती धरणात पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय आकाश बावणे याचा बुडून मृत्यू झाला. चप्पल शोधण्यासाठी खोल पाण्यात उतरल्याने त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
हिंगणघाट : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा वणा नदीवरील आजंती धरणात बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता ही घटना घडली. आकाश शेषराव बावणे, रा. बोरगाव दातार असे मृत तरुणाचे नाव आहे.