Wardha News: राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आली नियंत्रणात
Container Fire on National Highway at Hinganghat: हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग लागली; अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. ट्रकमध्ये माल जळून खाक, लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही.
हिंगणघाट (जि. वर्धा): राष्ट्रीय महामार्गावर सगुणा कंपनीजवळ कंटेनरला अचानक भीषण आग लागली. ट्रकमधून धूर निघत असल्याचे दिसून आले आणि पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.