esakal | एक महिन्यापासून तो होता बेपत्ता! शेवटी...
sakal

बोलून बातमी शोधा

crime

एका पतसंस्थेत गेल्या वर्षीपासून वसुली अभिकर्ता म्हणून काम करणारा हा तरुण 17 जूनला बेपत्ता झाला. त्याची तक्रार दिघोरी पोलिसांत करण्यात आली होती. पोलिसांनी तपास व शोध मोहिम राबविली.

एक महिन्यापासून तो होता बेपत्ता! शेवटी...

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

लाखांदूर(जि. भंडारा) : अलिम खॉं हा अभिकर्ता नेहमीप्रमाणेच 17 जून रोजी कामावर गेला. मात्र परत आलाच नाही. तो घरी न आल्याने आणि त्याचा काहीच पत्त लागत नसल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. गेल्या एक महिन्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र काहीच हाती लागत नव्हते.

एका पतसंस्थेत गेल्या वर्षीपासून वसुली अभिकर्ता म्हणून काम करणारा हा तरुण 17 जूनला बेपत्ता झाला. त्याची तक्रार दिघोरी पोलिसांत करण्यात आली होती. पोलिसांनी तपास व शोध मोहिम राबविली.

बारव्हा येथील हा अभिकर्ता 17 जूनला बारव्हा येथून लाखांदूरला स्वतः:च्या दुचाकीने (क्रमांक एमएच 36/ ई 2826) गेला होता. घरून जाताना त्याच्या जवळ अंदाजे 50 हजार रुपये रोख रक्कम होती. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी फोनवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याने 18 जूनला दिघोरी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यावरून दिघोरी पोलिसांनी परिसरात शोध घेतला. महिनाभर तपास चक्रे फिरविली जात होती.

तब्बल एक महिन्यानंतर सोमवारी त्या अभिकर्त्याचा दांडेगाव जंगलात कुजलेला मृतदेह आढळून आला. मृताचे नाव अलिम खॉं इस्माईल खॉं पठाण (वय 47,रा. बारव्हा) असे आहे.

दांडेगाव येथील घनदाट जंगलात सोमवारी गस्तीवर गेलेले वनमजुर ए. एन. कुळसुंगे यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह व दुचाकी आढळून आली. वनमजुराने तत्काळ लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि दिघोरी पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. त्यावरून वनपरिक्षेत्राधिकारी आर. एस. दोनोडे, वनपाल व्ही. बी. पंचभाई, वनरक्षक एस. जी. खंडागळे, जी. डी. हत्ते ठाणेदार नीलेश गावंडे, पोलिस कर्मचारी विष्णू थंडार्ते यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. हा मृतदेह त्या बेपत्ता अभिकर्त्याच असल्याचे निष्पन्न झाले.

सविस्तर वाचा - अमरावतीत पहिला प्रयोग! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आता संघटित प्रयत्नांचे अधिष्ठान

घटनास्थळावर मृतदेहापासून 10 ते 12 फूट अंतरावर मृताची दुचाकी आणि काही अंतरावर चपला आढळून आल्या. कुजलेला मृतदेह बांबूच्या झाडाजवळ झोपलेल्या अवस्थेत होता. यामुळे बेपत्ता अभिकर्त्याच्या मृत्यू कसा झाला? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार