झाडाला धडक बसून कार जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

यवतमाळ : गायीला वाचविताना भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने तिला आग लागली. अपघातात कार पूर्णपणे जळाली असून सुदैवाने आतील प्रवाशांना कुठलीही इजा पोहोचली नाही. ही घटना गुरुवारी (ता.5) रात्री राळेगाव ते वडकी मार्गावरील भांब एकबुर्जी गावाजवळ घडली.

गुरुवारी (ता. 5) रात्री होंडासिटी सिव्हिक (एसएच 15 बीटी 5000) ही कार राळेगावकडून वडकीकडे जात असताना गाडीसमोर गाय आडवी आली. तिला वाचवित असताना कार चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ती झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारमधून धूर निघण्यास सुरवात झाली. बघता बघता कारने पेट घेतला. यात ती पूर्णपणे जळाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hit the tree and burn the car