
भंडारा : भगवा म्हणजे तलवारीची धार आहे. भगवा म्हणजे शिवाजीची आण आहे. भगवा म्हणजे जिजाऊंचा आशिर्वाद आहे, भगवा म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेची शान आहे. ती जपण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्यात दौऱ्यावर आले असताना शनिवारी (ता.२८) रोजी दुपारी रेल्वे मैदानावर आयोजित आभार यात्रा व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.