

Accident
ESakal
संग्रामपूर - टुणकी ते लाडणापूर मार्गावर आज दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेल्या आदिवासी कुटुंबातील दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.