अमरावती - अमरावती ते दर्यापूर मार्गावरील भातकुलीहद्दीतील सायत गावाजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चौघे ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी (ता. २८) रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला..जुनेद खाँ मजीद खाँ (वय-२८, रा. अलमासनगर, बडनेरा), मुकुंद एकनाथ काळे (वय-५५, रा. प्रभा कॉलनी, अमरावती), गोपाल राजपुरोहित (वय-३५, रा. लख्खा, जि. जयसलमेर, राजस्थान) व प्रेम प्रकाश विष्णोई (वय-३०, रा. भटिंडा, जि. जोधपूर, राजस्थान), अशी मृतांची नावे असल्याची व शरद अळसपुरे (स्वागतम कॉलनी, अमरावती) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती भातकुलीच्या पोलिस निरीक्षकांनी दिली..एमएच २७ बीई ०१०३ क्रमांकाच्या कारने जुनेद खाँ, मुकुंद काळे व शरद अळसपुरे, हे तिघे अमरावतीहून दर्यापूरला वाहनाच्या कामानिमित्ताने गेले होते. बुधवारला रात्री परत येत असताना दर्यापूर मार्गावरील सायत गावातील मानकर ढाब्यासमोर विरुद्ध दिशेने एमएच ०१ एएच ६८१९ क्रमांकाची कार येत होती..या कारमध्ये गोपाल राजपुरोहित व प्रेम प्रकाश विष्णोई हे होते. भरधाव वेगाने येणाऱ्या या दोन्ही कारची सायत गावाजवळ समोरासमोर धडक बसली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघाताच्या वेळी कारमध्ये मागे बसलेले शरद अळसपुरे गंभीर जखमी झाले.जखमी अळसपुरे यांना आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात व त्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चौघांचे मृतदेह वाहनात फसले होते. ते मृतदेह भातकुली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात आणले..अपघाताच्या वेळी दर्यापूरवरून अमरावतीला येणारी कार जुनेद खाँ, तर भातकुलीवरून दर्यापूरला जाणारी दुसरी कार प्रेम बिष्णोई हे चालवित होते, अशी माहिती भातकुली पोलिसांनी दिली. अपघातातील मृत कारचालक प्रेम विष्णोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..बिष्णोई यांचे भातकुलीत हॉटेलया अपघातातील एक मृत प्रेम बिष्णोई हे मूळचे राजस्थानमधील भटिंडा येथील रहिवासी आहेत. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून ते भातकुलीमध्ये स्वीटमार्ट चालवतात. त्याच ठिकाणी गोपाल राजपुरोहित हेसुद्धा कामाला होते. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह निकटवर्तीयांनी कार्डियाक अॅम्ब्युलसमधून राजस्थानला पाठविले..कारच्या इंजिनचे दोन तुकडेदोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्यामुळे धडक बसल्यानंतर एका कारच्या इंजिनचे दोन तुकडे झाले. शिवाय धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या विरुद्ध बाजूने दूरवर फेकल्या गेली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.