esakal | आश्चर्यम! घोडीने दिला गाढवाला जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

hors and donky.jpg

कारंजा तालुक्यातील ग्राम काकडशिवनी येथील प्रकार असून, पंचक्रोशीत ठरतोय कुतूहलाचा विषय तर, हा प्रकार अशक्य असल्याचा पशुवैद्यकांचा दावा आहे.

आश्चर्यम! घोडीने दिला गाढवाला जन्म

sakal_logo
By
दीपक पवार

कारंजा (लाड) (जि.वाशीम) :  आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना आजमितीला कुठे, काय, कसे, केव्हा घडू शकेल याचा नेमच नाही. या कलीयुगामध्ये हंस चुगेगा दाना दुनका कौवा मोती खायेगा या दोह्याप्रमाणे काहीसा प्रकार कारंजा तालुक्यातील मूर्तिजापूर मार्गावरील काकडशिवनी या गावात घडला.

गेल्या 30-35 वर्षांपासून काकडशिवनी या गावामध्ये वास्तव्यास असणारे सुभाष नथ्थू सूर्यवंशी हे गृहस्थ आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला पांचाळ म्हणजेच लोहाराचा व्यवसाय करतात. विळे, कुऱ्हाड यासारखे शेतोपयोगी अवजारे गावात बनवून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शिवाय, आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये बाजारहाट सुद्धा करतात. मात्र, हा पारंपरिक व्यवसाय करताना आजच्या या आधुनिक युगात सुद्धा ते दळणवळणासाठी घोड्यांचा वापर करतात. त्यांची संगोपनासुद्धा आपल्या लेकरांप्रमाणे करत असल्याचे गावकरी बोलतात. 

महत्त्वाची बातमी - लैंगिक शोषणासाठी ‘त्याने’ बांधली होती छतावर झोपडी

हुबेहूब गाढवाच्या शिंगरूला जन्म
मागील दहा ते पंधरा वर्षांपासून ते आपल्या घरी घोडे पाळत असताना त्यांना अचानक आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या इथे एका घोडीने चक्क हुबेहूब गाढवाच्या शिंगरूला जन्म दिला. या अजब घोडयाच्या गजब शिंगरुमुळे गाववासीयांमध्ये कुतूहलाचे, आश्चर्याचे वातावरण निर्माण होऊन पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता घोडी मालक सुभाष सूर्यवंशी हे आपल्या अनुभवाच्या जोरावर हे शिंगरू गाढव जातीचेच असल्याचा दावा करीत आहे. तर, दुसरीकडे पशुवैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी हा दावा फेटाळून लावत आहे. 

सत्यता नेमकी काय?
वैद्यक शास्त्राच्या भाषेनुसार मारफॉलॉजिकल जरी ते शिंगरू गाढवाचे दिसत असेल तरी, जेनेटिकस व स्पेसिज बदलत नाही. फिनॉटिपिक कॅरेक्टरचा प्रकार असल्याचे पशुवैद्यकीय क्षेत्रातून बोलल्या जात आहे. मात्र, सत्यता नेमकी काय? हे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतरच निष्पन्न होणार आहे. परंतु, हा प्रकार आजच्या या आधुनिक जगतातील काही भोळ्याभाबड्या  गावखेड्यातील ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण करीत असल्याचे तितकेच खरे आहे. 

घोडी सदृश्य गाढवाच्या शिंगरूला जन्म
पशुवैद्यकीय शास्त्रानुसार सदरचे शिंगरू बाह्यस्वरूपी लहान असल्यामुळे गाढवासारखे दिसत असेल. परंतु, मुळतः एखादी घोडी सदृश्य गाढवाच्या शिंगरूला जन्म देणे असे, पशुवैद्यकीय शास्त्रानुसार होऊ शकत नाही.  
डॉ. ज्ञानेश्वर घाटोळ, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त