वसतीगृहाच्या विद्यार्थींनींनी पोलिसदादांना बांधल्या राख्या

संदीप रायपुरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

वसतीगृहातील पस्तीस विद्यार्थीनी गोंडपिपरी पोलिस ठाण्यात पोहचल्या. अन् मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिसांकडून या भगीनींना भेट म्हणून पेन व बूक देण्यात आले.

गोंडपिपरी जि. चंद्रपूर - विविध सण समारंभ शांततेत अन सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून पोलिस बांधव रात्रंदिवस एक करतात. सारा समाज सण साजरा करीत असतांना पोलिसबांधव कर्तव्यावर असतात.

अशातच रक्षाबंधनच्या दिवशी वसतीगृहातील विद्यार्थीनींनी गोंडपिपरी पोलिसांना सुखद धक्का दिला. नागरिकांच्या रक्षणाची हमी घेणाऱ्या पोलिसदादांना राखी बांधून त्यांनी रक्षाबंधन साजरा केला.

गोंडपिपरी येथे मातोश्री मुलींचे वसतीगृह आहे. अखिल ताडशेट्टीवार यांच्या संस्थेच्या वतीने हे वसतीगृह चालविले जाते.

वसतीगृहात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थींनी शिक्षण घेतात. एकदा वसतीगृहात आले की, महिनोमहिने गावाकडे परतायचं नाव नाही. एकतर अंतरही खूप दुसर शाळेला बूट्टी, अशात ओम विकास बहुउधेशीय संस्था प्रेरित राष्ट्रीय विकास मंच यांनी मातोश्री वसतीगृह प्रशासनासोबत समन्वय साधला. अन् वसतीगृहातील मुलींकडून पोलिस बांधवांना राखी बांधण्याच्या उपक्रमाची माहिती दिली.

यानंतर वसतीगृहातील पस्तीस विद्यार्थीनी गोंडपिपरी पोलिस ठाण्यात पोहचल्या. अन् मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिसांकडून या भगीनींना भेट म्हणून पेन व बूक देण्यात आले. सोबतच त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांच कामकाज नेमकं कसं चालते. 

याचसोबत हत्यार दारूगोळ्याची माहिती देण्यात आली. यावेळी ठाणेदार प्रविण बोरकुटे, पोलिस उपनिरीक्षक टि.जी.निंबेकर, पाणीकर, सत्यवान सुरपाम, बिके, गौरकार, प्रभू पुराम, विजयकूमार कोमल्ला, करमचंद दुर्गे, प्रफूल कांबळे, मुंडे, चव्हाण यांच्यासह संस्थेचे डॉ. भारत झाडे,भावना झाडे यांची उपस्थिती होती. दुरवर असलेल्या आपल्या भावांना राखी बांधू न शकणाऱ्या वसतीगृहातील विद्यार्थीनींनी कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांना राख्या बांधल्या. या कार्यक्रमाला भावनिक जोड बघायला मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hostel girls tied rakhi to Police boys