सिलिंडरच्या स्फोटाने घर जळाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

यवतमाळ : घरगुती वापराचा गॅस सिलिंडरमधून वायू गळती झाल्याने घराला आग लागल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्‍यातील गणेशपूर येथे घडली. या आगीमध्ये घरातील साहित्य जाळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गणेशपूर येथील राजू आसुटकर यांच्या पत्नी चहा बनविण्याकरिता स्वयंपाक खोलीत गेल्या होत्या. यावेळी शेगडी पेटवली असता शेगडीसह सिलिंडरला आग लागून भडका उडाला. सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने ही आग लागल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. या आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The house was burnt by a cylinder blast