नागपूरचे खड्डे किती खोल..खोल...

प्रतीक बारसागडे
सोमवार, 23 जुलै 2018

नागपूर : आर. जे. मलिष्कांच्या "सैराट' गाण्यामुळे राजधानी मुंबईचे खड्डे राज्यभर गाजत आहेत. मात्र, खड्ड्यांबाबत उपराजधानीही मागे नसल्याचे चित्र प्रत्येक रस्त्यांवर दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे नागपूरकरांच्या पाचवीलाच पुंजले आहेत. एक खड्डा वाचविताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन कधी उसळी घेईल, याचा नेम नाही. पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केलेले डांबरी रस्ते काही दिवसांतच कंत्राटदारांच्या "काळ्या कामा'चे पितळ उघडे पाडते.

नागपूर : आर. जे. मलिष्कांच्या "सैराट' गाण्यामुळे राजधानी मुंबईचे खड्डे राज्यभर गाजत आहेत. मात्र, खड्ड्यांबाबत उपराजधानीही मागे नसल्याचे चित्र प्रत्येक रस्त्यांवर दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे नागपूरकरांच्या पाचवीलाच पुंजले आहेत. एक खड्डा वाचविताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन कधी उसळी घेईल, याचा नेम नाही. पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केलेले डांबरी रस्ते काही दिवसांतच कंत्राटदारांच्या "काळ्या कामा'चे पितळ उघडे पाडते. परंतु, दरवर्षी महापालिका कंत्राटदारांचा हा "झोल' पोटात घालून घेत असल्याने आता रस्त्यांवरील खोल खड्डे नागपूरकरांच्या अंगवळणीच पडले असून मणक्‍याचे आजार, स्पॉन्डिलायटिसच्या रुग्णांत दरवर्षी वाढ होत आहे. महापालिका अधिकारी व कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे नागपुरातील ऑर्थोपेडीक डॉक्‍टरांचेही चांगलेच फावले आहे. शहरात 3 हजार 960 किमीचे रस्ते आहेत. यात महापालिकेच्या 2682 किमी रस्त्यांसह नासुप्रचे 1124, राष्ट्रीय महामार्ग 43.60, राज्य महामार्गाचे 7, इतर जिल्हामार्गाचे 62 तर 41 किमीच्या रिंग रोडचा समावेश आहे. यातील तयार झालेल्या सिमेंट रस्त्यांचा अपवाद सोडला तर एकही डांबरी रस्ता खड्ड्याशिवाय नाही. एकीकडे मेट्रो रेल्वेचे काम, सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांना नेहमीचा रस्ता वगळून दुसऱ्या रस्त्याने ऑफिस, दुकान, शाळा आदी ठिकाणी जावे लागत आहे. मात्र, तेही रस्ते खड्ड्यात गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: How deep is the pit of Nagpur