
बुलडाण्यात बारावीचा पेपर फुटल्यानंतर, बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश HSC Maths Paper Leak
बुलडाणामधील सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा आधीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गणिताचा पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासातच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मोठा गदारोळ पाहिला मिळाला.
दरम्यान हे प्रकरण अधिवेशनात पोहचलं विरोधी पक्षनेते अजित पवार या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. त्यांनी या प्रकारावर विधानसभेत नाराजी व्यक्त केली. यानंतर बोर्डाकडून याप्रकाराची गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान अमरावती बोर्डाचे सचिव उल्हास नरड यांनी प्रकाराची गांभीर्याने घेत पेपर फुटीची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. तर या प्रकारावर चौकशी झाल्याशिवाय अधिक बोलता येणार नाही. मात्र जे कोणी यात दोषी असतील त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिस कारवाई करतील, असे उल्हास नरड यांनी सांगितले. (ABP च्या वृत्तानुसार)
या पेपरफुटीवर अजित पवार सभागृहात आक्रमक झाले होते त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. अभ्यास करणाऱ्यां विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान झाले आहे. सरकार यावर काय करणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता.
अजित पवारांच्या या प्रश्नाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना सांगितले या प्रकरणी चौकशी करुन संध्याकाळपर्यंत माहिती देऊ अशी माहिती त्यांनी दिली होती.