Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त
Crime News: मोर्शी पोलिसांनी गुटख्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करत ३ लाख ७१ हजार रुपयांच्या गुटख्यासह १३ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हाफीज खान आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्शी : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी सुरूच आहे. स्थानिक गुन्हे शाखा व मोर्शी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ लाख ७१ हजार २५० रुपयांच्या गुटख्यासह १३ लाख २१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.