Yavatmal Crime: 'मानवी हाडांचे अवशेष आढळल्याने खळबळ': दिग्रसच्या रामनगर जवळच्या शेतातील घटना; नेमकं काय घडलं
Yavatmal Farm Mystery Case : रामनगर येथील शेतशिवारात आढळलेल्या या मानवी हाडांच्या अवशेषाजवळ ओळख पटेल अशी कोणतीच वस्तू न सापडल्याने संबंधित हाडांचे अवशेष कुणाचे, हे शोधण्याचे आव्हान दिग्रस पोलिसांपुढे आहे.
Human Bones Found in Yavatmal Farm Near Digras, Investigation Beginsesakal
दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्यातील रामनगर जवळील दिग्रस-मानोरा महामार्गाजवळून १०० मीटर आतमध्ये असणाऱ्या एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली मानवी हाडांचे अवशेष, कपडे व काही साहित्य आढळून आले. हा प्रकार सोमवारी (ता. ९) रात्री उघडकीस आला.