शंभर वर्षांपासून या परंपरेतून जोपासला जातोय गोडवा

विवेक मेतकर
Wednesday, 15 January 2020

मकर संक्रात सणाला पूर्वी मातीच्या भाजलेल्या सुगड्यातून वाण लुटत. या वाणात खूप काही असे. आपल्याकडे-आपल्या परसात, शेतात उगवलेल्या विविध वनस्पतींचे नमुने या सुगड्यात असतात. अशा नमुन्यांना ‘वाण’ हा शब्द आहेच. आमच्याकडची वाणं तुम्ही घ्या, तुमच्याकडची आम्हाला द्या. ‘दे वाण घे वाण’ असं म्हणत म्हणत संक्रांतीच्या वाणाची देवाणघेवाण सुरू झाली. आपल्या परसातल्या बिया दुसऱ्यांच्या परसात आणि त्यांच्या परसातल्या बिया आपल्या परसात लावल्या गेल्या. त्या दोन्ही वाणांच्या संकरातून आणखी चांगलं उत्पन्न देणारी, परस्परांचे चांगले गुण घेतलेली पिकांची नवी वाणं तयार होत गेली. या वाणाच्या माध्यमातून माळी परीवार मात्र वेगळाच गोडवा जपण्याचे काम करीत आहे. 

अकोला : मकर संक्रात सणाला पूर्वी मातीच्या भाजलेल्या सुगड्यातून वाण लुटत. या वाणात खूप काही असे. आपल्याकडे-आपल्या परसात, शेतात उगवलेल्या विविध वनस्पतींचे नमुने या सुगड्यात असतात. अशा नमुन्यांना ‘वाण’ हा शब्द आहेच. आमच्याकडची वाणं तुम्ही घ्या, तुमच्याकडची आम्हाला द्या. ‘दे वाण घे वाण’ असं म्हणत म्हणत संक्रांतीच्या वाणाची देवाणघेवाण सुरू झाली. आपल्या परसातल्या बिया दुसऱ्यांच्या परसात आणि त्यांच्या परसातल्या बिया आपल्या परसात लावल्या गेल्या. त्या दोन्ही वाणांच्या संकरातून आणखी चांगलं उत्पन्न देणारी, परस्परांचे चांगले गुण घेतलेली पिकांची नवी वाणं तयार होत गेली. या वाणाच्या माध्यमातून माळी परीवार मात्र वेगळाच गोडवा जपण्याचे काम करीत आहे. 

अकोला जिल्ह्यातील बहादूरा या गावातील माळी परिवारात 1910 साली जगदेव सीताराम पाटील यांचा जन्म मकर संक्रातच्या आधल्या दिवशी झाला. तेंव्हा त्यांच्या वडीलांनी अर्थात सीताराम पाटील यांनी मुलगा झाला म्हणून दुसऱ्याच दिवशी गावातील सर्व लहान मुलांना-मुलींना ऊस वाटून आनंद साजरा केला होता. 
तेंव्हा पासून दरवर्षी हयात असेपर्यंत स्व. सीताराम पाटील यांनी हा उपक्रम सुरू ठेवला त्यानंतर त्यांचे चिरंजीव स्व. जगदेव पाटील यांनी सुद्धा हा उपक्रम शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवला. नंतरच्या काळात याच पिढीत पुरुषोत्तम पाटील व त्यांचे लहान भाऊ वामनराव पाटील यांनी सुध्दा हा उपक्रम जसाच्या तसा सुरू ठेवला.  मात्र, 1996 ला पुरुषोत्तम पाटील यांच्या निधनानंतर आधीच्या चार पिढ्यांनी सुरू ठेवलेली परंपरा सुरू ठेवायची हा निर्णय घेतला. आज त्यांची चवथी पिढी विठ्ठल माळी आणि भागवत माळी यांनी ही परंपरा जोपासली आहे. 
 

1910 ला आमचे आबाजी जगदेव सीताराम पाटील यांचा जन्म मकरसंक्रातच्या आधल्या दिवशी झाला. तेंव्हा आमचे पणजोबा सीताराम पाटील यांनी मुलगा झाला म्हणून दुसऱ्याच दिवशी गावातील सर्व लहान मुलांना-मुलींना ऊस वाटून आनंद साजरा केला होता. तेंव्हा पासून दरवर्षी आमचे आजोबा जगदेव पाटील, वडील पुरुषेत्तम पाटील माळी यांनी हा उपक्रम जपला. आता चवथ्या पिढीतही मी व माझे लहान भाऊ भागवत ही परंपरा जपत आहोत.
- विठ्ठल पुरुषोत्तम माळी, बहादूरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundreds of year celebtating makar sankrant in akola