शेकडो तरुणींचे "एमएमएस' व्हायरल?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः शेकडो तरुणींचे कपडे बदलवितानाचे "एमएमएस' व्हायरल झाल्याचे वाचून डोके ठणकलेय ना! पण हे सत्य आहे. शहरातील हा सहावा गुन्हा आहे. यामुळे यापुढे महिला आणि मुलींना मॉल, कपड्यांचे दुकान आणि शोरूममध्ये कपडे बदलताना सावधता बाळगण्याची गरज आहे. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो तरुणींचे एमएमएस वेबसाइटवर व्हायरल झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. एका नामांकित कापड व्यापाऱ्याने शहरातील अनेक मुलींच्या एमएमएसचा बेवसाइटशी सौदा केल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे.
आबालवृद्धांचे कपडे आणि शृंगार साहित्याच्या मार्केटसाठी प्रसिद्ध सीताबर्डीतील फ्रेंड्‌स या कपड्याच्या दुकानातील "ट्रायल रूम'मध्ये किसन अग्रवाल या दुकान मालकाने नोकर निखिल चोथमल याच्या मदतीने मोबाईल लपवून ठेवला होता. या मोबाईलमधून कपडे बदलणाऱ्या महिला व युवतीचे तो एमएमएस बनवीत होता. अनेक वर्षांपासून फ्रेंड्‌स कापडाचे दुकान सुरू आहे. महाविद्यालयीन तरुणींचे हे दुकान फेव्हरिट आहे. त्यामुळे आतापर्यंत शेकडो मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ शूटिंग अग्रवालने केले असावेत. कॅमेरा क्‍वालिटी चांगली असलेल्या मोबाईलने ट्रायल रूममध्ये कपडे बदलणाऱ्या मुलींचे शेकडो व्हिडिओ आतापर्यंत बनविले गेले असावेत. ते व्हिडिओ आतापर्यंत इंटरनॅशनल वेबसाइट्‌स किंवा यू-ट्यूबर टाकून अनेक आंबटशौकिनांच्या मोबाईलवर दिसत असतील. अग्रवालप्रमाणेच इतरही दुकानदारांनी व्हिडिओ बनविले आहेत का, याची माहिती पोलिस घेत आहेत. या माध्यमातून शहरातील शेकडो तरुणींचे आतापर्यंत एमएमएस तयार झाले असल्याची शक्‍यता आहे. ते लाखो लोकांच्या मोबाईलवर शेअर झाले असावेत. त्यामुळे महिला-युवतींनी कुणावर विश्‍वास ठेवावा, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
काय दक्षता घ्यावी?
ट्रायल रूम किंवा चेंजिंग रूममध्ये कपड्याच्या हॅंगरमध्ये, फॅनमध्ये, दरवाजामध्ये किंवा आरशात अशा ठिकाणी "स्पाय कॅमेरा' किंवा "हिडन कॅमेरे' ठेवले जातात. त्यामुळे कपडे बदलण्यापूर्वी रूममधील सर्व उपकरणे, भिंती आणि सीलिंगवर नजर फिरवावी. युवतींनी कपडे बदलताना सर्वप्रथम ट्रायल रूममधील लाइट बंद करावा. तसेच पंख्याची गरज नसेल तर तो सुरू करू नये. आरशाला बोट लावून बोटामधील अंतरावरून कॅमेरा ओळखता येतो.
काय करावे?
चेंजिंग रूममध्ये काही संशयास्पद आढळल्यास लगेच 100 डायल करून पोलिसांना माहिती द्यावी. दुकान मालक किंवा नोकरांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे-कुठे आहेत, याकडे लक्ष ठेवावे. अनेक दुकान मालक कॅबिनमध्ये बसून लॅपटॉपवर चेंजिंग रूममधील व्हिडिओ पाहतात. चेंजिंग रूमसह महिलांच्या प्रसाधनगृहातही हिडन कॅमेरे लावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे मॉल, शोरूममधील रूम वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे.
व्हिडिओची होतेय विक्री
यू-ट्यूब आणि ट्रिपल एक्‍स वेबसाइडवर हजारो मुलींचे हिडन कॅमेराने घेतलेले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यात येतात. शहरातील मुलींचे अश्‍लील फोटो फेसबुक, यू-ट्यूब आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात. प्रत्येक फोटो आणि व्हिडिओसाठी काही विशेष वेबसाइट्‌सद्वारे पैसे देण्यात येतात. त्यामुळे काही दुकानदार युवतींचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओंची विक्री करीत असल्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com