भुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे "गुलसितां'

केवल जीवनतारे
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

भुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे "गुलसितां'
नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात. परंतु, भूकबळी ठरलेल्य लक्ष्मीच्या जाण्याने लेकरांचा आधार गेला. मोठा मुलगा "वामन्या'च्या डोळ्यांतून रक्ताश्रू वाहत होते. परंतु, न खचता दुःख झेलत वाघिणीचं दूध असलेल्या शैक्षणिक क्रांतीचा उजेड दोन कोवळ्या भावाच्या हाती देण्याचा संकल्प त्याने केला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हा बाबासाहेबांचा संदेश "गुलसितां' लघुपटातून नाटककार दादाकांत धनविजय यांनी दिला. या लघुपटाची ठाणे महोत्सवात निवड झाली.

धनविजय गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत कार्यरत आहेत. विदर्भात दलित नाट्य चळवळीचे बीजारोपण करणाऱ्या पहिल्या पिढीतील कलावंत, लेखक, दिग्दर्शक, कथाकार म्हणून त्यांची ओळख. नुकतेच "गुलसितां' लघुपट तयार केला. कथा-नाट्यलेखनासह त्यांची लेखणी "स्क्रीन'कडे वळली. आयुष्यभर अंधार झेलत जगणाऱ्या अनाथ मुलांच्या हाती उजेड देणारा संदेश देत, लघुचित्रपटातून भुकेल्या पोटाचे राजकारण करणाऱ्यांवर प्रहार करीत सत्ता टिकवण्यासाठी समाजातील नेतृत्वाला कळसूत्री बाहुलीसारखे वापरणाऱ्या विकृतींना समाजासमोर आणले.
नाट्यलेखनातून उपेक्षितांचा आक्रोश रंगमंचावर मांडताना हक्कासाठी संघर्ष करण्याचे सशक्त माध्यम म्हणून कलेकडे बघावे, हा त्यांचा संदेश. प्रायश्‍चित एकांकिका, "जागरण'पासून तर "अंधत्व' या पथनाट्यासह "अकिंचन', "विकल्प', "कफल्लक' अशा पन्नासच्या वर मराठी हिंदी नाट्यातून त्यांनी विविध विषय हाताळले. वेदना, विद्रोह, संघर्ष, अन्याय, अत्याचार, शोषणाचे विदारक दर्शक त्यांच्या नाट्यातून घडते. बदलत्या स्थितीचे भान ठेवून आंबेडकरी समाज, बोधी संस्कृती असलेला सुसंस्कृत समाज निर्माण करणाऱ्या "अस्तित्व' या त्यांच्या कथा लेखनाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला.

"गुलसितां' या लघुचित्रटातून विदर्भातील तरुण दिग्दर्शक सुबोध उके मिळाला. तर सह-दिग्दर्शक निर्मिती जीवनतारे यांच्यासह नितीन मरस्कोल्हे, संजय वाघमारे, तनुश्री वंजारी, सक्षम गणवीर, गायत्री डोले अशा अनेक कलावंतांना संधी मिळाली. कला परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे. तमाशा, भारुड, चव्हाटा नाट्य, पथनाट्य असे काळानुसार माध्यम बदलत आहे. आता स्क्रीनचा जमाना आहे. यामुळे सामाजिक-सांस्कृतिक ऐक्‍यासाठी अभिप्रेत असलेला बाबासाहेबांचा विचार स्क्रीनच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आहे.
-दादाकांत धनविजय, नाटककार, नागपूर

Web Title: the hunger news