पत्नीने घेतला गळफास, अन् पतीने....

रवींद्र शिंदे
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

वाई (पोड) गावातील रंजना कुळसंगे या महिलेने आपल्या पहिल्या पती पासून फारकत घेऊन गावातीलच विनोद गेडाम याच्यासोबत संसार करीत होती. ते दोघेही शेतमजुरी करून आपली गुजराण करीत होते.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच तिच्या पाठोपाठ पतीनेदेखील विषप्राशन केल्याची घटना तालुक्यातील वाई (पोड) येथे आज बुधवारी (ता. 7) दुपारी घडली. रंजना शत्रुघ्न कुळसंगे असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती विनोद गेडाम याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यातील वाई (पोड) गावातील रंजना कुळसंगे या महिलेने आपल्या पहिल्या पती पासून फारकत घेऊन गावातीलच विनोद गेडाम याच्यासोबत संसार करीत होती. ते दोघेही शेतमजुरी करून आपली गुजराण करीत होते. दरम्यान, आज बुधवारी वाई येथील शेतशिवारात रंजनाने साडीच्या साहाय्याने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच विनोद गेडाम यानेदेखील विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला तत्काळ यवतमाळ येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्या दोघांनी इतकी टोकाची भूमिका का घेतली, याबाबतची माहिती समजू शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband also try to commit suicide after wife s death