esakal | बैलांसाठी बैलबंडी शेततळ्यात उतरविली अन् पती-पत्नीचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बैलांसाठी बैलबंडी शेततळ्यात उतरविली अन् घडले अघटित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरपना (जि. चंद्रूपर) : बैलांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या पत्नी-पत्नीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ४) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील मांडवा येथे घडली. मृतांची नावे अनिल डाहुले (वय ४०) आणि छाया अनिल डाहुले (वय ३५) अशी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कोरपना तालुक्यात येत असलेल्या मांडवा येथील अनिल डाहुले यांची गावापासून काही अंतरावर शेती आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. सोमवारी (ता. ४) सकाळी अनिल आणि पत्नी छाया हे दोघेही बैलबंडीने शेतावर गेले. शेतीची कामे आटोपली. त्यानंतर दुपारी घराकडे बैलबंडीने येण्यास निघाले.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

परतीच्या वाटेवर सार्वजनिक शेततळे आहे. बैलांना तहान लागल्याचे पाहून अनिलने बैलबंडी शेततळ्याच्या पाण्यात उतरविली. बैलाने खोल पाण्यात बंडी ओढत नेल्याने त्यावर बसलेले अनिल व छाया हे दोघेही बुडाले. बंडीवरून सुटून दोन्ही बैल पोहत बाहेर आले. ही घटना गावकऱ्यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते येईपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचे पथक आले. दोघांचे प्रेत पाण्या बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृताला चौदा वर्षांचा मुलगा आहे. आई-वडिलांच्या मृत्यूने तो पोरका झाला.

loading image
go to top