चिचाळा येथे घर कोसळल्याने पती-पत्नी गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 August 2019

आंबोली (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसाने चिंचाळा (शास्त्री) येथील घर कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्या घरातील पंधरा शेळ्याही जागीच ठार झाल्या. पुयारदंड येथे सोमवारी (ता. 26) सकाळी सात वाजता सखुबाई गावंडे यांच्यावर घराची भिंत कोसळली. गडपिपरी येथे नरेंद्र करकाडे यांचे राहते घरही पावसाने कोसळले.

तालुक्‍यात रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिंचाळा (शास्त्री) येथील दौलत ज्योतिबा गजभिये आणि पत्नी हे झोपले होते. झोपेत त्यांचे घर कोसळले. घर कोसळून दोघेही दबल्या गेले. याची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांनाही बाहेर काढले. त्यांच्या घरातील तब्बल 15 शेळ्याही जागीच मृत्युमुखी पडल्या. दोघांनाही आधी भिसी येथील आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. तेथून त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
पुयारदंड येथील सखुबाई गावंडे या सकाळी चहा पित होत्या. तेव्हा त्यांच्या अंगावर घराची भिंत पडली. यात त्या जखमी झाल्या. त्याच्या मुलाने त्यांना बाहेर काढले. त्यांना नागपुरात हलविण्यात आले. गडपिपरी येथील नरेंद्र करकाडे यांचे घरही पावसाने कोसळले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, श्‍याम डुकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife serious as house collapses at Chichala