पती-पत्नीला टिप्परने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा, ता. कामठी) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीत वाहनचालक असलेला विजय मागील पाच वर्षांपासून गुमथळा येथे राहत होता. त्याला पाच वर्षांची मुलगी आहे. पत्नी गर्भवती असल्याने विजय तिला नियमित तपासणीसाठी दुचाकीने नागपूर येथे घेऊन येत होता. दुचाकीवरून येताना गुमथळा उड्डाणपूल ओलांडल्यावर सर्व्हिस रोडवरून महामार्गावर घेताच उड्डाणपुलावरून वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यामुळे दुचाकीसह पती, पती दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिच्या पोटातील गर्भदेखील बाहेर आला होता. तर पायावरून चाक गेल्याने विजय गंभीर जखमी झाला. पोलिसांना माहिती मिळताच जखमी विजयला उपचारासाठी व मृत नीलूला मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजयचा मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास मौद्याचे ठाणेदार मधुकर गीते करीत आहेत.
विजय व नीलू दोघेही नागपूरला जात असल्याने त्यांनी मुलगी माहीला गुमथळा येथील तिच्या शाळेत सोडले होते. अपघातानंतर विजयच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. आई व वडिलांचा मृत्यू झाल्याची तिला माहितीदेखील नव्हती. अपघात होताच त्याच्या झपारा येथील कुटुंबीयांना कळविण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife were crushed by a tipper