संशयाचे भूत! फेसबूकवरून मैत्री, प्रेम, लग्न आणि हत्या

संशयाचे भूत! फेसबूकवरून मैत्री, प्रेम, लग्न आणि हत्या

चिमूर (जि. चंद्रपूर) : संशयावरून पतीने पत्नीची हत्या (Husband kills wife) केली. मासळ येथील बेघर वस्तीत ही घटना घडली. मृत पत्नीचे नाव विशाला दीक्षित पाटील (वय २९) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती दीक्षित हरिदास पाटील याला अटक केली आहे. बुधवारी आरोपीला न्यायालयात सादर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी (Accused remanded in judicial custody) मंजूर करण्यात आली. (Husband-kills-wife-over-suspicion-of-character)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील मासळ गावातील दीक्षित हरीदास पाटील याची गोंदिया येथील विशाखा या युवतीशी फेसबूकवरून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दीड वर्षापूर्वी त्यांचे मासळ येथे तंटामुक्ती समितीने लग्न लावून दिले. त्यांना सहा महिन्यांपूर्वी गोंडस मुलगी झाली. तिचे नाव विदिशा ठेवण्यात आले.

संशयाचे भूत! फेसबूकवरून मैत्री, प्रेम, लग्न आणि हत्या
निंदनीय! पतीने परवानगी दिल्याने दिराने केला वहिनीवर बलात्कार

मात्र, लग्नाच्या काही दिवसांतच संशयाचे भूत दीक्षितच्या मनात शिरले होते. यातून दोघांत नेहमी भांडण होऊ लागली. दीक्षित विशाखाला मारझोड करायचा. याची तक्रार विशाखाने चिमूर पोलिस स्टेशनलाही केली होती. मात्र, त्यानंतरही त्रास कमी झाला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी विशाखा माहेरी निघून आली. दीक्षितने विशाखाची समजूत घालून परत मासळ येथे आणले.

२९ जून रोजी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात दीक्षितने लाकडी काठीने विशाखावर प्रहार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दीक्षितने स्वतःच फोन करून चिमूर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड, उपपोलिस निरीक्षक राजू गायकवाड पोलिस सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आरोपी दीक्षित याला ताब्यात घेतले.

प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी शेजारी महिलेच्या तक्रारीवरून दीक्षितविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. बुधवारी आरोपीला न्यायालयात सादर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

(Husband-kills-wife-over-suspicion-of-character)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com