esakal | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घाई, ३५०० EVMची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

election

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घाई, ३५०० EVMची तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात आगामी काळात नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदेसोबतच तिसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका (local bodies election in yavatmal) प्रस्तावित आहेत. या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात ‘ईव्हीएम’ (EVM) लागणार आहेत. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार कंट्रोल युनिटची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी हैदराबाद येथील दहा इंजिनिअरचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. (hyderabad team inspect 3500 evm for local bodies election in yavatmal)

हेही वाचा: महापालिका निवडणूक सहा महिने लांबणार; विधेयकाला मंजुरी नाही

कोरोनामुळे अनेक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पहिल्या तसेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर घेण्यात आल्या. मात्र, यानंतर कोरोना वाढला. फैलाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंध लावले. निवडणुका स्थगित केल्या. काही ठिकाणी मुदतवाढ तर काही ठिकाणी प्रशासकांची नेमणूक केली. जिल्ह्यातील नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले आहे. येत्या काही महिन्यांत नगरपालिकांची मुदत संपणार आहे. यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा कार्यकाळ वर्षाअखेरीस संपुष्टात येणार आहे. परिणामी, जिल्ह्यात नव्या वर्षात निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम पुढे जाण्याची शक्यता आहे. असे असेल तरी निवडणुका घ्याव्याच लागणार आहे. त्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. यासाठी ईव्हीएम तसेच कंट्रोल युनिट लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी सात जिल्ह्यातून ईव्हीएम आणण्यात आल्या होत्या. यातील अनेक मशीन बंद होत्या. त्या दुरुस्त करण्याची मोहीम निवडणूक विभागाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात वणी, मारेगाव, झरी, घाटंजी, दिग्रस, केळापूर, उमरखेड, महागाव आदी नऊ तालुक्यांतील ईव्हीएम तपासणी होणार आहे. यासाठी हैदराबाद येथील दहा इंजिनिअरचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. नऊपैकी पाच तालुक्यांतील कंट्रोल युनिट जिल्हा मुख्यालयात दाखल झाले आहे. त्याची तपासणी तसेच दुरुस्ती येत्या काही दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. निवडणुकीची वेळ निश्‍चित नसली, तरी प्रशासनाकडून निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे.

उपविभागीय स्तरावर तपासणी -

जिल्ह्यात नऊ तालुक्यांतील ईव्हीएम यवतताळ येथे बोलविण्यात आल्या आहेत. उर्वरित तालुक्यांतील मशीनची तपासणी केली जाणार आहे. यवतमाळ उपविभागातील बाभूळगाव, आर्णी, दारव्हा उपविभागीत नेर, दिग्रस, राळेगाव उपविभागातील कळंब या ठिकाणी ईव्हीएमची तपासणी व दुरुस्ती केली जाणर आहे.

आगामी काळातील निवडणुका होणाऱ्या संस्था

  • नगरपंचायत-७

  • नगरपालिका-१०

  • जिल्हा परिषद-१

  • पंचायत समिती-१६

  • ग्रामपंचायत-७०

  • ग्रामपंचायत पोटनिवडणूक- २५ ते ३०

loading image
go to top