Bhandara Explosion : उशिरा येईन असे बोलून गेले, अन् परतलेच नाही ! स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या संजयकुमारच्या पत्नीचा आक्रोश
Explosion Victims : जवाहरनगर येथील आयुध निर्माणीतील स्फोटात संजयकुमार कारेमोरे यांचा मृत्यू झाला. सकाळी घरून जातांना "उशिरा येईन" असे बोलून गेलेले संजय कधीच परतले नाहीत. त्यांच्या मृत्यूसमोर पत्नी रोशनीचा हळहळता आक्रोश.
कोदामेंढी (मौदा, जि.नागपूर) : जवाहरनगर (जि.भंडारा) येथील आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटात आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. खात (ता. मौदा) येथील संजयकुमार रामचंद्र कारेमोरे (वय ३४) यांचा देखील त्या स्फोटात मृत्यू झाला.