उदात्तकार्यासाठी आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा; आदिवासींना दिली स्वकर्तुत्वाची ओळख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaibhav waghmare

IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; आदिवासींना दिली स्वकर्तुत्वाची ओळख

मांजरखेड कसबा : काही व्यक्तींच्या आयुष्याचे ध्येय असते आपण सर्वोच्च पदावर पोहोचायचे. त्यासाठी ते आयुष्यभर झटत असतात. आयएएस हे नोकरी क्षेत्रातील सर्वोच्च पद. अमरावती जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी धारणी (आयएएस) या पदावर कार्यरत असलेल्या वैभव वाघमारे या ३० वर्षीय तरुणाने आपल्या सर्वोच्च नोकरीचा राजीनामा दिला. जीवनात काहीतरी अजून चांगले व उद्दात्त करण्याच्या शोधापोटी आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला आहे.

२०१६ च्या कॅडरमधील अधिकारी असलेले वैभव वाघमारे यांची एक वर्षापूर्वी धारणी प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती झाली. केवळ कार्यालयात बसून काम न करता आदिवासींसोबत खाली बसून त्यांच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे. मोहफुलांच्या माध्यमातून मेळघाटातील सुमारे ३०० गावांत मोहफुल बँक नावाची संकल्पना रुजविली. यातून शार्क थिंक प्रोजेक्ट अंतर्गत नुक्लिअर बँकेमार्फत स्थानिक गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आठ एप्रिल रोजी आदिवासी आश्रमशाळा टिटंबा येथे आदिवासी विकास योजनांची माहितीसाठी मेळघाट विकास दूत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आदिवासी बंधू-भगिनींना उद्देशून बोलताना म्हटले की, तुमची समस्या दोन वेळचे जेवण आहे. तुमची ही समस्या केवळ तुम्ही स्वतः अनुभवता. ही समस्या सुटण्यासाठी तुमच्यातील व्यक्तींनी अधिकारी होणे गरजेचे आहे. ज्या दिवशी ही समस्या सुटेल त्या दिवशी मेळघाटचा खरा विकास होईल, असे सांगितले.

वैभव वाघमारे यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून कोरोना काळातील लसीकरणासंदर्भात उल्लेखनीय कार्य केले आहे. गत एक महिन्यात स्वतःला बंदिस्त करीत अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी केले. यामधून प्रेरणा घेत व्यक्तीला केवळ दहा हजारांत उत्तम जीवन जगता येते. नोकरीचा राजीनामा देण्याच्या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार मानले. आयएएस, आयआरएस, आयआरएएस अशा तीन सर्वोच्च मानाच्या पदावरील तीन वर्षांच्या काळात जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला जो मिळविण्यासाठी २०-३० वर्षांचा कालावधी लागला असता. आयएएस देशातील सर्वोत्तम नोकरी आहे, पण ते एखाद्याला आवडेलच व त्याने ती आयुष्यभर केलीच पाहिजे हे आवश्यक आहे का? असा प्रतिप्रश्न करीत सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याबाबत निर्णय जाहीर केलेला आहे.

Web Title: Ias Officer Vaibhav Waghmare Resigns For Sublimity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..