esakal | आदर्श शिक्षक पुरस्कार वेटिंगवर : 5 सप्टेंबरचा मुहूर्त टळणार
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

आदर्श शिक्षक पुरस्कार वेटिंगवर : 5 सप्टेंबरचा मुहूर्त टळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत चर्चा सुरू झाली आहे. यंदा 5 सप्टेंबरलाच पुरस्कार वितरण सोहळा होणार हे ठासून सांगितले जात असले तरी अद्याप पुरस्कार प्राप्तीर्थी यादीच फायनल नसल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदासुद्धा पुरस्काराचा मुहूर्त टळणार का ?, अशी चर्चा सुरू आहे.
यंदा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता 14 तालुक्‍यांतून 25 शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यापैकी 21 जणांच्या मुलाखती निवड समितीने घेतल्या आणि त्यातून 13 शिक्षकांची नावे फायनल झाली. मात्र अद्यापही त्यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे समजते. रवींद्र घवळे (जि.प. शाळा जांबू), राजेश धायंदे (जिप शाळा बाभुळरखेडा), संदीप घाटे (जि.प. शाळा बोरखडी), अशोक बावनेर (जि.प. शाळा जामठी), रोहिणी चव्हाण -चाटणकर (जि.प. शाळा बोराट्याखेडा), ज्ञानेश्‍वर राठोड (जि.प. शाळा जैतादेही), आशीष पांडे (जि.प. शाळा टेंभा), सचिन वावरकर (जि.प. शाळा चांदूरवाड), गजानन होले (जि.प. उच्च प्राथ शाळा अमरावती), नीलेश इंगोले (जि.प. शाळा बऱ्हाणपूर), मोहन निंघोट (जि.प. शाळा नेरपिंगळाई), विनोद राठोड (जि.प. शाळा सालनापूर), अनुपमा कोहळे (जि.प. शाळा काळविठ), विलास बाबरे (जि.प. शाळा भानखेडा), अश्‍विनी विधाते (जि.प. शाळा एकलारा), अजय अडिकने (जि.प. शाळा कवाडगव्हाण), नंदकिशोर पाटील (जि.प. शाळा वावरूळी), राजू व्यवहारे (जि.प. शाळा जळगावआर्वी), गजानन डमके (जि.प. शाळा बोराळा) आदी शिक्षकांचे प्रस्ताव आदर्श पुरस्काराकरिता प्राप्त झाले आहे.

loading image
go to top