Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

समृद्धी महामार्गालगत असलेल्या इंटरचेंज पॉईंट परिसरात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल विक्री केंद्रावर राज्यस्तरीय दक्षता पथकाने ता. ८ सप्टेंबर रोजी धडक कारवाई केली.
Illegal Biodiesel Stock Worth rupees 2 Lakh 19 thousand Seized Unauthorized Sale

Illegal Biodiesel Stock Worth rupees 2 Lakh 19 thousand Seized Unauthorized Sale

sakal

Updated on

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गांवाजवळ समृद्धी महामार्गालगत असलेल्या इंटरचेंज पॉईंट परिसरात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल विक्री केंद्रावर राज्यस्तरीय दक्षता पथकाने ता. ८ सप्टेंबर रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाच्या साठ्यासह एकूण २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या अचानक झालेल्या कारवाईमुळे तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com