Solar Energy Fraud : अवैध गौणखनिज प्रकरणी ६७ लाख ५१ हजारांचा दंड
Illegal murum transport : मोताळा तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्पासाठी विनापरवाना ४५० ब्रास मुरूम साठा व वाहतुकीबद्दल संबंधितांवर ६७.५१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. बनावट नाहरकत प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही याच प्रकल्पावर झाला आहे.
मोताळा : सौरऊर्जा प्रकल्पासाठी विनापरवाना ४५० ब्रास मुरूमाची अवैधरित्या वाहतूक व साठा केल्याप्रकरणी संबंधितांना ६७ लाख ५१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा आदेश मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.