

कन्हान : कन्हान पोलिसांनी अवैध वाळू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ६३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत सात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील पाच टिप्पर ट्रक व ३५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.