
लोणार : मराठवाड्यातील पुर्णा नदीतुन लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती वाहतुक सूरू आहे. याला महसुल विभागाचा आशिर्वाद लाभत असल्याची चर्चा आहे. सुरवातीला महसुल विभागाने फक्त देखावा करत चेकपोस्ट स्थापन केल्या. मात्र, रेतीमाफीयांनी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी केल्यानंतर सदर चेकपोस्ट केवळ शोभेच्या वास्तू बणून उभ्या दिसत आहेत.