पोस्टल स्टॅम्पमार्फत गांधीजींच्या कार्याला उजाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर ः महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 72 देशांत गांधीजींच्या स्मरणार्थ पोस्टल स्टॅम्प प्रकाशित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्य डाक घर नागपूर येथे तीनदिवसीय गांधी संग्रहाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनानिमित्त एकत्रित आलेल्या गांधी प्रेमींशी संवाद साधला असता, त्यांनी आताच्या पिढीने गांधीजी समजावून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

नागपूर ः महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 72 देशांत गांधीजींच्या स्मरणार्थ पोस्टल स्टॅम्प प्रकाशित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्य डाक घर नागपूर येथे तीनदिवसीय गांधी संग्रहाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनानिमित्त एकत्रित आलेल्या गांधी प्रेमींशी संवाद साधला असता, त्यांनी आताच्या पिढीने गांधीजी समजावून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रदर्शनात वीस गांधीप्रेमींनी संग्रहाचे प्रदर्शन लावले असून, यात महात्मा गांधी यांच्या कार्यकाळातील, 1948 च्या सर्व्हिस स्टॅम्प पासून ते 2018 पर्यंतच्या सर्व स्टॅम्प, पोस्टकार्ड, ग्रीटिंग, फर्स्ट डे कर्व्हर, मिनीचेज शिट आदी हजारो संग्राह्य गोष्टींचा समावेश केला आहे. गांधीजीचे स्वावलंबन, खादीप्रेम, तुरुंगवास आदी सर्व प्रसंग पोस्टल तिकीट आणि पोस्टकार्डच्या माध्यमातून, प्रदर्शित करण्यात आले आहेत.

80 वर्षांच्या सोनारांचा संग्रह
निवृत्त रेल्वे कर्मचारी सुधाकर सोनार यांनी आपल्या वयाच्या दहाव्या वर्षापासून गांधीजीच्या तिकिटाचा संग्रह करण्यास सुरुवात केली होती, ती आजवर कायम आहे. सोनार यांच्याकडे महात्मा गांधी यांची सर्व स्टॅम्प, पोस्टकार्ड उपलब्ध असून, त्यांची संख्या काही हजारांत असल्याचे त्यांनी सांगीतले. गांधीजीच्या वस्तूंच्या संग्रहाबरोबरच आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचेही संग्रह करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोनार यांच्यासह ऍड. पुष्कराज देशपांडे, प्रा. प्रसन्न देशपांडे, कपील बन्सोल, नेहा रामटेके, जयंत खेडकर, अनंत पाठक आदींचे संग्रहन प्रदर्शनात लावण्यात आले आहे.

गांधीजींचा सर्व्हिस स्टॅम्प लाखोंचा
1948 मधील गांधीजींचे छायाचित्र असलेल्या गुलाबी-जांबळ्या रंगाचे 10 रुपयांचे आणि लेक सर्व्हिसवाले फक्त 13 पोस्ट स्टॅम्प सर्कुलेशनमध्ये आहेत. हा स्टॅम्प स्विझर्लंडमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्याची मूळ प्रत फक्त राष्ट्रपती भवन आणि मुख्य टपाल खात्यात संग्रहित आहे. संग्रहाकडे असलेले स्टॅम्प खरे नसून, त्यांच्या दुय्यम प्रती मार्केटमध्ये विकल्या जात आहेत. 1948 मधील सर्व्हिस स्टॅम्पची किंमत आता लाखोंच्या घरात असून, भारतीय जुन्या तिकिटांचा हा संग्रह खूप दुर्मीळ प्रमाणात आहे, असे छंदप्रेमी संस्थेचे संस्थापक जयंत खेडकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illustrate Gandhi's work through postal stamps