यवतमाळातल्या प्रयोगशाळेने कोरोना चाचणीत बजावली महत्त्वाची भूमिका, दररोज होते साडेतीनशेवर नमुन्यांची चाचणी

corona
corona

यवतमाळ : कोरोनाने जगण्याचे सगळे संदर्भच बदलले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे कोराना निदानाची. अचानकच मानवी जीवनावर चाल करून आलेल्या या आजाराच्या निदानासाठी सुरुवातीच्या काळात खूपच कमी व्यवस्था उपलब्ध होती. मात्र आरोग्य क्षेत्राने युद्धस्तरावर प्रयत्न करीत प्रयोगशाळा उभारल्या आणि कोरोना चाचणीसाठी दिवसरात्र एक करून सेवा दिली.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अथक परिश्रमानंतर व्हीआरडीएल (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नॉस्टिक लेबॉरटरी) अर्थात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा उभी झाली. त्याला केवळ महिनाभराचा कालावधी झाला आहे. या महिनाभरात कोरोनाच्या तब्बल पाच हजार हजार चाचण्यांचा टप्पा पार केला. या प्रयोगशाळेवर यवतमाळ, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील तपासणींचा भार आहे.

कोरोनाचे यवतमाळात मार्च महिन्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच प्रयोगशाळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात प्रयोगशाळेचे बांधकाम सुरू असतानाच मजुरही मिळेनासे झाले होते. त्यामुळे प्रयोगशाळा सुरू होणार की नाही, यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर जून महिन्यात व्हीआरडीएल प्रयोगशाळा सुरू झाली व कोरोनाच्या चाचणीला प्रारंभ झाल्याने मोठा दिलासा मिळाला. या प्रयोगशाळेत 150 पेक्षा जास्त चाचण्या करण्याची क्षमता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे येथील तपासणीसाठी येणाऱ्या नमून्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांतूनही सॅम्पल तपासणीसाठी येत आहेत. कर्मचारी संख्या कमी असतानाही चोवीस तास सॅम्पल निदानाचे कामकाज सुरू आहे. सीबी-नॅटमशीनमध्ये दोन तासात चार नमूने तपासले जातात. आरटी-पीसीआर मशीनमध्ये पाच तासांत 35 नमूने तर, ट्रूनॅटमध्ये दोन नमून्यांचे रिपोर्ट दोन तासांत येतात. प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून तीनही जिल्ह्यातील 339 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसाला 350 ते 375 सॅम्पल तपासणीसाठी येत आहेत. जून महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. एका महिन्यात पाच हजारांपेक्षा जास्त नमूने तपासण्यात आले आहेत

जिल्हानिहाय पॉझिटिव्ह अहवाल
यवतमाळ- 197
वाशीम -101
बुलडाणा-41


आंतरराष्ट्रीय दर्जाचीप्रयोगशाळा
व्हिआरडीएल प्रयोगशाळेत अमेरिका, सिंगापूर व जर्मनी येथून अद्ययावत मशीनरी आलेल्या आहेत. त्यामुळे ही प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली आहे.जास्तीतजास्त सॅम्पलचे निदान करण्याचे कामकाज आमच्याकडून सुरू आहे. मधल्या काळात बुलडाणा येथूनही सॅम्पल तपासणीसाठी आले होते.
डॉ. विवेक गुजर
सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.
...............................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com