
वर्धा : सैतानाची भीती दाखवत कथित मांत्रिकाने इंझापूर येथील एका कुटुंबाला लाखो रुपयांनी गंडा घातला. शिवाय त्याने संबंधित कुटुंबाच्या घरातील सोन्याचा ऐवजही चोरून नेला. या प्रकरणी सोमवार (ता. १९) सावंगी पोलिस ठाण्यात कथित मांत्रिकावर जादूटोणा विरोधी कायदा व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.