Climate Technologysakal
विदर्भ
Climate Technology: कधी मिळेल शेतकऱ्यांना बिनचूक अंदाज? हवामान विभागाच्या सदोष अंदाजांचा बसतोय आर्थिक फटका
Agriculture Loss: भारतातील हवामान खात्याचे अंदाज चुकत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अचूक हवामान भाकीतासाठी अद्ययावत यंत्रणा गरजेच्या आहेत.
नागपूर : भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांना हवामानाविषयी बिनचूक अंदाज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, भारतात हवामान विभागाचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. पैसा, तंत्रज्ञान व तज्ज्ञ मंडळी सर्वकाही उपलब्ध असूनही दुर्दैवाने याचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होताना दिसत नसल्याचे निराशाजनक चित्र सध्या संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे.