मुख्यमंत्र्यांनी केले सेवाग्राम विकास आराखडा कार्यक्रमाचे उद्‌घाटन

NGP
NGP

वर्धा : २ आक्टोबर रोजी संपूर्ण देशाने महात्मा गांधींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जिथे कायम तेवत राहिले त्या सेवाग्राममध्येही गांधी जयोतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या कार्यक्रमाला आॅनलाईन हजेरी लावली.

ब्रिटिशांना चले जावं चा नारा देत ज्या भूमीतून महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनात पेटविली. अशा पुण्यभूमी सेवाग्रामला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता सदैव कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.

महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखडा उद्‌घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महात्मा गांधींची प्रतिमा स्वागतपर भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवाग्राम विकास आराखड्‌याची संपूर्ण व विस्तृत माहिती घेतली. या आराखड्‌याकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना दिली.

सविस्तर वाचा - कलावंतांनी साकारला सुरेख लघुपट

वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असून महात्मा गांधी यांच्या स्वप्नानुसार "गाव बनाव- देश बनाव" या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्याकरिता विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितले. येत्या काळात वर्धा नगरीला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता महाविकास आघाडी कटिबद्ध राहील असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com