
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दारू विक्रीला परवानगी मिळाली असून, दारूड्याची पुन्हा एकदा अंगात फिनफिनली असल्याचे दिसून येत आहे.
पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा) : जिल्ह्यात गेल्या 46 दिवसांपासून दारूबंदी असल्यामुळे दारूड्याची मोठी पंचाईत झाली होती. अनेकांनी व्यसन कमी होईल असा निष्कर्ष वर्तविला होता तर अनेकांनी गावठीचा आधार व्यसन केले होते.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दारू विक्रीला परवानगी मिळाली असून, दारूड्याची पुन्हा एकदा अंगात फिनफिनली असल्याचे दिसून येत आहे. याच दारूच्या नशेत बुलडाणा तालुक्यातील सातगाव भुसारी येथील एका दारुड्याने वृद्धेला पतीसह शिवीगाळ करत जमिनीवर आदळल्याची घटना 7 मे ला घडली. यामध्ये वृद्धेचा मृत्यू तर पती जखमी झाला आहे.
आवश्यक वाचा - धक्कादायक साथ जी नही सकते, साथ मर तो सकते है ना, असे म्हणतं त्यांनी...
रायपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या सातगाव भुसारी येथे 7 एप्रिलला 80 वर्षीय सरस्वती भालेराव या वृद्ध महिलेने आरोपी अनिकेत विनोद चौथमल (वय 21, रा. सातगाव भुसारी) हा वृद्ध पती- पत्नीला दारूच्या नशेत तर्रर होऊन शिवीगाळ करत होता. त्यामुळे मृतक महिलेने त्याला तू आम्हाला शिवीगाळ का करतो आहे असे विचारले असता अनिकेत याने वृद्ध महिलेसह तिच्या पतीला हाताने उचलून जमिनीवर आपटले.
यामुळे घटनास्थळीच गंभीर जखमी झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला तर वृद्ध पतीसुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मृतकाची मुलगी शंकुतला ठोंबरे यांनी घटनेची तक्रार रायपूर पोलिस स्टेशनला दिली आहे. यावरून ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. याप्रकरणी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे व अमोल गवई यांनी पंचनामा करुण आरोपी अनिकेत चौथमल याच्यावर रायपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करुण अटक केली आहे.