
अकोला : कोरोना व्हायरसनं सध्या देशभरात थैमान घातलं आहे. ज्यात लहान मुलं आणि वृद्धांना या व्हायरसचा जास्त धोका असल्याचं डॉक्टर व तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे जर मुलांची इम्युनिटी स्ट्रॉन्ग (रोग प्रतिकारशक्ती) नसेल तर सध्याच्या लॉकडाउनमध्ये मुलांच्या आहारात सकस आहार व विटामिन युक्त पदार्थांचा समावेश करुन त्याची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची संधी पालकांकडे आहे. मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणतीही औषधं देण्यापेक्षा घरातील सोपे उपाय करता येऊ शकतात. प्रतिकारशक्ती सक्षम असेल तर कोणत्याही प्रकारच्या आजाराची लागण होत नाही आणि निरोगी आयुष्याकडे त्याची वाटचाल सुरू होते. त्यामुळे मुलांना इम्युनिटी बूस्टरचा डोज देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
हंगामी फळं उपयोगी
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आंबट फळात असलेल्या ‘विटामिन सी’मुळे इम्युनिटी स्ट्रॉन्ग होते. सर्दी-खोकल्याशी लढण्यासाठी शरीराला हे विटामिन स्ट्रॉन्ग बनवतं. त्यामुळे हंगामानुसार मुलांना द्राक्षं, संत्री, मोसंबी यासारखी फळं नक्की खायला द्या.
पालेभाज्यात आहेत पोषक तत्व
हिरव्या भाज्या खाण्यासाठी लहान मुलं नेहमीच नाकं मुरडतात. मात्र हिरव्या भाज्यांत अधिक पोषक तत्व असतात. कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी या भाज्यांचं सेवन केल्यास संसर्गजन्य आजाराशी दोन हात करतात येतात. तसंच रंगीत भोपळी मिरचीत ‘सी’ जीवनसत्व अधिक प्रमाणात असतं जे सर्दी, खोकला या आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.
फळांमधून मिळते जीवनसत्व
संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी, किवी आदी फळांमध्ये फायटोकेमिकल्स आणि फ्लॅवेनॉइड्स असतात. तसंच अँटीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असल्याने ते रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात. यासह ज्या फळांमध्ये सी जीवनसत्व, मॅगनीज, मॅग्नेशिअम असतं अशी सर्व फळं मुलांना देण फायदेशीर आहे.
मोड आलेली कडधान्य
कडधान्य आरोग्यसाठी फायदेशीर असतात. मात्र त्याला मोड आलेलं असले तर त्याचे अधिक फायदे शरीराला होतात. त्याने पोषक घटकांचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना मोड आलेले कडधान्य दिल्यास त्याचा फायदा मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी होऊ शकतो.
सुकामेव्यात आहे सुदृढ आरोग्याचे रहस्य
बदाम, जवस, सूर्यफुलाच्या बिया आदींमध्ये ई जीवनसत्व असतं. त्यामुळे मुलांच्या आहारात सुकामेवा देखील हवाच. सकाळी उठल्यानंतर बदाम किंवा पेंड खरूजाचे सेवन केल्यास मुलांची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यासोबत बेदान्याचे (मनुका) सेवन केल्याने सुद्धा मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यास मदत होते.
समतोल आहारातून मिळतात जीवनसत्वं
लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना विटामिन सी युक्त फळ खायला द्यावी. त्योसोबतच विटामिन ए युक्त पदार्थां नियमित जेवणात वापरावे. समतोल आहार घेतल्यास मुलांची रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. ॲलोपॅथीमध्ये झिंक व विटामिन सीची औषध देवून मुलांची रोग प्रतिकारक शक्त्ती वाढवता येऊ शकते. परंतु त्यापेक्षा मुलांना फळं दिल्यास उत्तम.
- डॉ. विनित वरठे
प्राध्यापक व विभाग प्रमुख बाल रोग चिकित्साशास्त्र,
शासकीय वैद्यकीय महाविद्याल, अकोला
झोप, संतुलित आहार व व्यायाम महत्वाचा
लहान मुलांची रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये मुलांनी रात्री व दिवसा पुरेशी झोप घेणे महत्वाचं आहे. झोप पूर्ण न झाल्यास मुलं चिडचिड करतात. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होते. पालेभाज्या, डाळी, फळं व इतर संतुलित आहार घेतल्या मुलांना जीवनसत्व व इतर प्रथिने मिळतात. याव्यतिरिक्त मुलांनी व्यायाम केल्यास उत्तम परंतु सध्याच्या स्थितीत व्यायाम शक्य नसल्याने घरातच लहान-मोठे खेळ खेळल्यास मुलांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- डॉ. नरेंद्र राठी
बाल रोग तज्ज्ञ, स्माईल चिल्ड्रेन हॉस्पीटल, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.