एकट्याच्या श्रमदानातून ज्ञानगंगावर साकारला बंधारा

विरेंद्रसिंह राजपूत
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुका हा अवर्षणप्रवन क्षेत्रात असल्याने 'एक बुंद की किमत क्या होती है' हे जवळपास तालुक्यातील सर्वांना कळून चुकले आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून नांदुरा खुर्द येथील प्रकाश जोशी यांनी गावाशेजारीच ज्ञानगंगा नदीवर दररोजच्या २ तासाच्या श्रमदानातून २ वर्षाच्या मेहनतीतून बंधारा तयार केला आहे. मागील आठवड्यात पडलेल्या साधारण पावसामुळे या बंधाऱ्यात पाणी आल्याने हा बंधारा तुडुंब भरून पाणीदार झाला आहे.

शासन एकीकडे 'पाणी अडवा पाणी जिरवा'साठी 'जलयुक्त शिवार'सारखे अभियान राबवून करोडो रुपये खर्च करून आवश्यकता नाही तेथेही बंधारे उभारत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जनतेलाही सद्या कळून चुकले असून अनेक ठिकाणी गावकऱ्यांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्यातून नदीचे पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदुरा खुर्द येथील प्रकाश सिद्धेश्वर जोशी यांनी तर 'एकला चलो रे'च्या भूमिकेतून सतत दोन वर्ष प्रति दिवशी दोन तासाची अंगमेहनत घेत ज्ञानगंगा नदीवर एक छोटासा बंधारा तयार केला आहे.

२ वर्षाच्या श्रमदानातून बंधारा निर्मिती काळात त्यांनी वेळोवेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना याबाबत माहिती दिली. परंतु त्यांना कोणीच सहकार्य केले नसल्याचे त्यांनी 'सकाळ'ला सांगितले. गेल्या आठवड्यात या नदी परिसरात पाऊस झाल्याने ज्ञानगंगावरील हा बंधारा पाण्याने तुडुंब भरला आहे. आगामी काळासाठी सिंचनाला व पाणीटंचाईला फायदा व्हावा यासाठी प्रत्येकाने श्रमदानातून वाट मिळेल तिथे बंधारा तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन चळवळ उभारावी असेही त्यांनी बोलतांना सांगितले.

Web Title: individual work and built small dam on DnyanGanga river