
नागपूर : वाठोड्यातील भिलगाव परिसरात बनावट नोटांचा कारखाना असल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान या प्रकरणी मध्यप्रदेशातील इंदूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यापैकी एकाला नागपुरातील जरीपटका येथील चॉक्स कॉलनी परिसरातून अटक केल्याची माहिती समोर आली.