Gondia Crime Sakal
विदर्भ
Gondia Crime : घरफोड्या करणारा अट्टल चोरटा अटकेत...२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा व तिरोडा पोलिसांची कारवाई
House Theft : गोंदिया आणि तिरोडा पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे बिस्कीट आणि अन्य चोरीचे सामान जप्त करण्यात आले.
गोंदिया : घरफोड्या करणारा अट्टल चोरट्याला सोन्याच्या दागिन्यांसह एक महिन्यानंतर अखेर अटक करण्यात आली. त्याच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व तिरोडा पोलिसांनी केली. विष्णू खोकण विश्वास (वय ३४, रा. अरुणनगर, ता. अर्जुनी मोरगाव) असे या चोरट्याचे नाव आहे.