जाने कुटुंबीयांवर प्रशासनाकडून अन्याय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

जलालखेडा(जि. नागपूर) : आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी स्वत:चे सरण रचून कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. कुटुंबाचा गाडा हाकताना कर्जाचा डोंगर वाढत असल्याने आता मुलाने आत्महत्या केली. परंतु प्रशासन मात्र वेगळेच कारण सांगून जाने कुटुंबीयांवर अन्याय करीत असल्याचा आरोप युवानेता सलील देशमुख यांनी केला. ते मदना येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी जाने यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले असता बोलत होते. प्रमोद यांनी मृत्यूपूर्वी कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे पत्रात लिहिले आहे. तरीसुद्धा प्रशासन वेगळे कारण कसे काय देऊ शकते, असा प्रश्न आता समोर आला आहे.

जलालखेडा(जि. नागपूर) : आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी स्वत:चे सरण रचून कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. कुटुंबाचा गाडा हाकताना कर्जाचा डोंगर वाढत असल्याने आता मुलाने आत्महत्या केली. परंतु प्रशासन मात्र वेगळेच कारण सांगून जाने कुटुंबीयांवर अन्याय करीत असल्याचा आरोप युवानेता सलील देशमुख यांनी केला. ते मदना येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी जाने यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले असता बोलत होते. प्रमोद यांनी मृत्यूपूर्वी कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे पत्रात लिहिले आहे. तरीसुद्धा प्रशासन वेगळे कारण कसे काय देऊ शकते, असा प्रश्न आता समोर आला आहे. नरखेड तालुक्‍यातील मदना येथील प्रमोद गोपाळराव जाने यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचे मृत प्रमोद प्रशासनाला सांगत होता. परंतु त्याचे त्यावेळी कोणीच ऐकले नाही. कर्जाचा डोंगर वाढच असल्याने प्रमोद यांनीसुद्धा आत्महत्या केली. घटनेची माहीती मिळताच सलील देशमुख यांनी जाने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी कुटुंबीयांनी प्रमोद यांनी आजारामुळे आत्महत्या केली, असे कारण प्रशासन समोर करीत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. एकीकडे शेतकरी मदत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि दुसरीकडे प्रशासन मात्र अशा गंभीर प्रकरणात दुःखात असलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगून सलील देशमुख यांनी अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच धारेवर धरले. स्वत: मृत चिठी लिहून ठेवत आहे आणि पोलिस मात्र ती चिठ्ठी जप्त न करता वेगळेच कारण देत असल्याने सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The injustice done by the administration to the Jane family