Shiv Sena शिवसेनेच्या वतीने अतिवृष्टी भागाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी शेतकऱ्यांना केली मदत

Shiv Sena : शिवसेनेच्या वतीने अतिवृष्टी भागाची पाहणी

बोर्डी : अकोलखेड आणि उमरा महसुल मंडळात गत तीन दिवसांत ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे परिसरातील नदी-नाल्याला पूर आल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. अशा वेळी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत केली.

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ढगसदृश्‍य पाऊस झाल्याने शेती पिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक घरातही पाणी शिरल्याने घरातील धान्य खराब झाले, घरांची पडझड झाली, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. वेचनीला आलेल्या कापसाचा सुरुवातीचा एकरी दोन-तीन क्विंटलचा वेचा आला.

परंतु, अतिवृष्टीमुळे कापूस मातीमोल झाला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी, हेक्टराची मर्यादा न ठेवता मदत देण्यात द्यावी, मदत न दिल्यास जिल्हा शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी यावेळी दिला. दातकर यांनी उमरा, मक्रमपूर, बेलुरा, पिंप्री जैन, पिंप्री खुर्द, नेव्हरी, पिंपळखुटा, बोर्डी, लाडेगाव, शिवपूर, आकोलखेड येथील पीक पाहणी व पडझड झालेल्या घराची पाहणी केली.

यावेळी माजी आ.संजय गावंडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोंचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, साहेबराव भगत, प्रा.अतुल म्हैसने, ज्ञानेश्वर ढोले, जगन निचळ, उपसरपंच राजेश भालतिलक, सूरज गोभोंत, राजू येऊल, सुभाष सूरतने, मनिष महाले, उमरा उपसरपंच प्रभुदास खवले, अविनाश गावंडे, किरण शेंडे, ऋषिकेश लोणकर, नंदलाल ताडे, सोपान साबळे, रमेश खिरकर,

विनोद गये, अनिल जयस्वाल, विष्णू पखाले, प्रशांत येऊल, संजय रेळे, नंदुकुमार बोंद्रे, योगेश सुरत्ने, अजय नांदुरकर, अमोल सोनोने, हरीभाऊ मानकर, पांडुरंग मेतकर, मनोज सोनोने, राजेश भारसाकळे, राजू जवजाळ, अरुण सपकाळ, शंकर साबळे, नागोराव डाबेराव, सागर साबळे, ज्ञानेश्वर कोळसकर, डिगांबर वसू, दिलीप साबळे, गजानन वसू, निरुती वाकोडे,

पद्माकर महल्ले, देवानंद खिरकर, अशोक वसू, आनिल ताळे, पुरुषोत्तम चेळे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार नीलेश मडके यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचणामे करण्याचे संबंधितांना निर्देश दिले.

कृषी विभागाकडून पाहणी सुरू

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी पाहणी केल्यानंतर कृषी विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.