सात दिवसांत खड्डे बुजविण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर : खड्ड्यांसाठी महापालिकेलाच दोषी धरले जात असून, इतर संस्था मात्र मौन धारण करून आहेत. अखेर आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वच संस्थांना सात दिवसांत खड्डे बुजविण्याचे निर्देश देत खडे बोल सुनावले.

नागपूर : खड्ड्यांसाठी महापालिकेलाच दोषी धरले जात असून, इतर संस्था मात्र मौन धारण करून आहेत. अखेर आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वच संस्थांना सात दिवसांत खड्डे बुजविण्याचे निर्देश देत खडे बोल सुनावले.
शहरांमध्ये विविध संस्थांची विकासकामे सुरू आहेत. या संस्थांच्या समन्वय समितीची बैठक आज मनपा मुख्यालयात पार पडली. आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव मनपा अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, एनएमआरसीएलचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, अधीक्षक अभियंता, एमएसइडीसीएल, मनपा जलप्रदाय, विद्युत, हॉटमिक्‍सचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते. शहरात विविध शासकीय यंत्रणेच्या मालकीचे रस्ते असून, अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे ठिकठिकाणी खड्डे करण्यात येत असतात. या कामांसाठी अवजड यंत्रसामग्री व साहित्य रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याकामाचा समन्वय साधण्यासाठी ही समिती गठीत केल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. महानगरपालिका व अन्य शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात आलेले खड्डेही पुढील सात दिवसांत बुजविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नासुप्र क्षेत्रातील खड्डे नासुप्रच्या हॉटमिक्‍स विभागाने बुजविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पूर्व व उत्तर भागातील खड्डे नासुप्रच्या हॉटमिक्‍स विभागाने करावे, त्याचा खर्च महापालिका देईल, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. एमएसईडीसीएल विभागाने त्यांच्या विभागाद्वारे केबल टाकण्यासाठी केलेल खोदकाम सात दिवसांत दुरूस्त करावे, असेही निर्देश त्यांनी दिले. यानंतर खड्डे करण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्‍यक राहील, असेही त्यांनी सुनावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions for quenching pits in seven days