Amravati News: अमरावती पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी टोळीला अटक करून २१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीने शहरातील २७ घरफोड्यांची कबुली दिली असून अन्य सदस्य फरार आहेत.
अमरावती : घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (ता. चार) अटक केली असून, त्यांच्याकडून २१ लाख ३६ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने शहरातील २७ गुन्ह्यांची कबुली दिली.