

Chandrapur kidney trafficking case latest news
esakal
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरणातील महत्त्वाचा दुवा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील डॉ. रविंद्रपाल सिंग याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल महिनाभर फरार असलेला डॉ. सिंग याने मंगळवारी ब्रह्मपुरी न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.