बहूचर्चित हत्याकांडाच्या तपासाची गाडी राईट ट्रॅकवर

tushar pundkar
tushar pundkar
Updated on

अकोट (जि. अकोला) : बहूचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडाच्या पोलिस तपासाची गाडी तीन दिवसानंतर राईट ट्रॅकवर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी सोमवार (ता.24) दिली. या तपासाच्या प्रगतीचा आढावा जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर यांनी शहर पोलिस ठाण्यात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेऊन घेतला. जिवापाड मेहनत घेऊन सुरू असलेल्या तपासात ठोस व अपेक्षित परिणाम, हत्याकांडाचा धक्का व धसका बसलेल्या अकोटच्या नागरिकांना लवकरच पहायला मिळणार असल्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त झाले.


अत्यंत गुंतागुंतीची ही मर्डर मिस्ट्री सोडविण्यासाठी निष्णात पोलिस अधिकाऱ्यांची सुमारे सात पथके प्रचंड मेहनत करत आहेत. या सात पथकांमध्ये आयजीपीचे एक व 30 अधिकारी-कर्मचाऱ्यांची सहा पथके कार्यरत आहेत. अकोट पोलिस ठाण्याच्या नजिकच्या इतिहासात तपासाचे एवढे मोठे व मेगास्वरुप पहिल्यांदाच दृष्टीस पडत आहे. या तपासात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची मदत लाभत आहे. या व्यतिरिक्त राज्याचे सीआयडी खाते या हत्याकांडाचा स्वतंत्र तपास करत असल्याचे समजते. तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.24) घटनास्थळापासून ते शहरातील अनेक ठिकाणं तपासासाठी पिंजून काढल्याचे समजते. या हत्याकांडाशी संबंधीत प्रत्येक बारीक माहितीची दखल तपास यंत्रणा घेत आहे. या माहितीची शहानिशा केली जात असल्याचे दिसून आले.

पोलिस वसाहतीला कुंपण आवश्यक
हे हत्याकांड दुर्दैवाने पोलिस वसाहतीत घडल्याने या वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या दिवशी मारेकऱ्यांच्या गोळीचा नेम चुकला असता तर कदाचित आणखी दूसरे अघटीत घडले असते. या वसाहतीला एक कुंपण भिंत व वसाहतीतील निवासस्थानांचे नुतनीकरण आवश्यक आहे. वसाहतीत सुरक्षाविषयक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे चर्चिले जात आहे.


उच्च दर्जाची सीसी यंत्रणा आवश्यक
या हत्याकाडानंतर शहराच्या सुरक्षेसाठी उच्च दर्जाची सीसी कॅमेरा यंत्रणा लावण्यासाठी शासनासह सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सीसी कॅमेऱ्यांची वाढ करून त्यांची निगा राखण्याची जबाबदारी जोपासणे आवश्यक आहे. त्याशिवाय नव्या घराचे बांधकाम करतांना घरमालकाला सीसी कॅमेरे लावण्याचा आग्रह प्रशासनाकडून व्हायला पाहिजे, असे मत काही सुज्ञ नागरिकांनी मांडले. शहरातील पथदिवे नियमित सुरू रहावेत याची खातरजमा संबंधित यंत्रणेने करावी, अशी सुध्दा मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com