Wardha News : हिंगणघाट येथे आयपीएल सामन्यावर जुगार खेळणाऱ्या बुकीवर पोलिसांनी छापा टाकत २.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा सुरू होता.
वर्धा : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंगच जुगार खेळणाऱ्या बुकींवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी २ लाख ५२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगणघाट येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३० मे रोजी ही कारवाई केली.